अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : प्रेमसंबंधाची गावात सुरू असलेली चर्चा थांबावी, यासाठी कोहकडी येथील सतीश सुखदेव गायकवाड या तरुणाने प्रेयसी व मित्राच्या मदतीने स्वतःच्या घातपाताचा बनाव रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
सतीश सुखदेव गायकवाड, त्याचा मित्र निखिल भानुदास गागरे (ताहाराबाद) व प्रेयसीविरोधात बुधवारी पहाटे गुन्हा दाखल झाला. रविवारी रात्री शिरूर येथून घरी परतत असताना फॉरेस्टच्या हद्दीत स्वत:चा घातपात झाला असल्याचा बनाव सतीशने रचला.
त्याची दुचाकी बिबट्याचे ठसे असलेल्या ठिकाणी टाकून देण्यात आली. मोबाइल, तसेच बूटही टाकण्यात आला. बनाव करून पसार होण्यापूर्वी घरातील साठ हजार रुपयांची रोकडही त्याने हस्तगत केली होती.
मोबाइल टाकून दिल्यानंतर त्याने दुसऱ्याच्या नावावर घेतलेले सीमकार्ड त्याच्याजवळील मोबाइलमध्ये टाकले. तेच सीमकार्ड तोे घातपात झाल्याचा बनाव केल्यानंतर प्रेयसीला संदेश पाठवण्यासाठी करत होता.
सतीश संगमनेर येथे असल्याचे लक्षात आले. सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार बोत्रे, भालचंद्र दिवटे, सत्यजित शिंदे यांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.
तेथील बर्फाच्या कंंपनीमध्ये सतीशने नोकरी मिळवली होती. तेथे राहण्यासाठी खोली भाड्याने घेऊन संसारोपयोगी साहित्याची खरेदीही करण्यात आली होती.
घातपाताचा बनाव यशस्वी झाल्यानंतर प्रेयसीही पसार होणार होती. त्यानंतर दोघे विवाह करणार होते. एकमेकांमध्ये झालेल्या संदेशाच्या देवाणघेवाणीवरून ही माहिती पोलिसांच्या हाती लागली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews