पोलिसांशी वाद घालने मायलेकाच्या आले अंगलट !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  विनामास्क एकाच दुचाकीहून जाणाऱ्या दोघांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांशी वाद घालने मायलेकाच्या चांगलेच अंगलट आले आहे.

आई व मुलाने पोलिसांशी वाद घालत कारवाईला विरोध केल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लखन मारुती शिंदे ( वय २१), सुमनबाई प्रारुती शिंदे (वय ५०, शिवाजीनगर, संगमनेर) असे त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक संदीप बोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.

याबाबत सविस्तर असे कि, मंगळवारी संध्याकाळी शहरातील रस्त्यावर नियम मोडणाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कारवाई करत होते. यावेळी एकाच दुचाकीहून (एम.एच.१७,बी.टी.३३६३) दोन जण तोंडाला मास्क न लावता जात होते.

पोलिसांनी त्यांना थांबवित दुचाकी ताब्यात घेतली. त्यानंतर लखन शिंदे याने त्याची आई सुमनबाई शिंदे हिला बोलावून घेतले. या दोघांनीही पोलिसांशी वाद घालत सुमनबाई हिने महिला पोलिसाशी बाचाबाची केली.

तर लखन शिंदे याने दुचाकी लोटत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.जी.साबळे करीत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment