अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथून मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या जालिंदर सोमनाथ पवार (वय ३०) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी १२ वाजता कोपरगाव बेट भागात गोदावरी नदीपात्रात आढळला.
नदीपात्रात सुमारे सहा हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थळ पंचनामा करत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, हा तरुण नदीपात्रात कशासाठी गेला होता, याची माहिती मिळू शकली नाही. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार तो १६ जूनला दुपारी घरातून निघून गेला होता.
उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल एस. एच. गायमुखे करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews