अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : वैद्यकीय कारणाने पुण्याहून प्रवास करून आलेल्या राशीन येथील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती प्रशासन घेत असल्याचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले.
कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. राशीन येथील व्यक्तीला लक्षणे दिसत असल्याने स्वॅब घेण्यात आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने तत्काळ संबंधित परिसर प्रतिबंधित केला.
निकटच्या संपर्कातील राशीन येथील सहा, तर श्रीगोंदे येथील दहा अशी एकूण १६ व्यक्तींना स्वॅब तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आल्याची माहिती तहसीलदार आगळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली.
२१ मे रोजी सुनेकडे आलेल्या मूळच्या वाशी येथील ६५ वर्षीय महिलेला कोरोना झाल्याने कर्जत तालुक्यात या विषाणूचा शिरकाव झाला होता.
या महिलेचा मृत्यू वगळता राशीन येथील इतर सहा जणांनी कोरोनावर यशस्वी मात करत ८ जूनला कर्जत तालुका कोरोनामुक्त करण्यात प्रशासनाने यश मिळवले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews