वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठीही उपस्थित राहता आले नाही….

Published on -

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोरोना प्रादुर्भावामुळे जगभरातील विमानसेवा सध्या बंद आहे मात्र याचा फटका एका मुलाला बसला आहे त्याला विमानसेवा बंद असल्याने स्वताच्या वडीलांच्या अंत्यविधीला ही उपस्थित रहाता आले नाही.

श्रीरामपूर येथील यशश्री टेक्सटाईल या दुकानाचे मालक वींरेंद्र हरकचंद कोठारी (वय ६१) यांची पहाटे प्राणज्योत मालवली.

त्यांचा मुलगा गौरव न्यूयॉर्क येथे नोकरीस आहे. विमानसेवा बंद असल्याने वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी त्याला उपस्थित राहता आले नाही.

वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. एकुलता एक मुलगा नोकरीनिमित्त अमेरिकेत.

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी तो येऊ शकला नाही.

वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठीही उपस्थित राहता आले नाही यामुळे अंत्यसंस्कार त्याला ऑनलाइन बघावा लागला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News