अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : भारतात कोरोनाने हाहाकार घालण्यास सुरुवात केली असून अवघ्या 24 तासात 14 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
देशात पहिल्यांदाच गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 516 ने वाढ झाली असून 375 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 95 हजार 048 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 13 हजार 831 रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 68 हजार 269 इतके आहेत. गेल्या 24 तासात 9 हजार 120 रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासात कोरोनामुळे 375 जणांचा मृत्यू झाला आहे तर देशात एकूण बळींची संख्या 12 हजार 948 इतकी झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews