राहुरी :- पैशांच्या कारणातून विवाहित तरुणीस विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरातील भुजाड़ी इस्टेट मल्हारवारी रोड मुथा कुटुंबीय वास्तव्यास आहे,
विवाहित तरुणी सौ. संजना श्रीपाल मुथा, वय २९ हिला तिचा नवरा श्रीपाल चंदनमल मुथा याला बँकेची हप्ते भरण्याचे पैसे मागितले असता तो म्हणाला की, पैसे देणार नाही. तुला नांदविणार नाही,
असे म्हणून शिवीगाळ करुन सासु बबिता चंदनमल मुथा, सासरा चंदनमल मुथा यांनी विवाहितेस मारहाण केली, व शिवीगाळ करत धमकी दिली.
याबाबत दिलेल्या तक्रारीत विवाहितेने म्हंटले आहे कि, आरोपी नवरा श्रीपाल चंदनमल मुथा याने विषाची बाटली घेवून मला खाली पाडून तोंडात जबरदस्तीने विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान यात गंभीर स्थितीत संजना यात गंभीर स्थितीत संजना श्रीपाल मुथा या विवाहित तरुणीस नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
तिने दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी नवरा श्रीपाल चंदनमल मुथा, चंदनमल मुथा, बबित चंदनमल मुथा, रा, कोल्हार भगवती, ता. राहाता, हल्ली रा. भुजाडी इस्टेट मल्हारवाडी रोड, राहुरी यांच्याविरुद्ध शहरी पोलिसांत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गर्मीमुळे त्रस्त आहात?, मग कूलरमध्ये टाका ही 10 रुपयांत मिळणारी वस्तु, मिळेल ACसारखा थंडावा! वीजबिल वाढण्याचंही नो टेंशन
- महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा जीआर ‘या’ तारखेला निघणार! समोर आली मोठी अपडेट
- पैसा तर येतोय पण हातात टिकत नाहीये? वास्तुशास्त्रातील ‘हा’ उपाय करून बघा! पैशांची चणचण कधीच भासणार नाही
- यमलोकाचा मार्ग आहे ‘ही’ पायरी? भगवान श्रीकृष्णानेच यमराजासाठी सांगितलं होतं हे स्थान; जगन्नाथ मंदिरातील ही कथा तुम्हाला माहीतेय का?
- पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवणार मलामाल, 2 वर्षातच मिळणार जबरदस्त रिटर्न