अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

Published on -

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे.

सागर आनंद साळवे (२०, दैठणेगुंजाळ ता. पारनेर, नगर) असे आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश प्रवीण चतुर यांनी ही शिक्षा सुनावली. २० फेब्रुवारी २०१७ रोजी हा प्रकार घडला होता.

मुलगी शाळेतून दुपारच्या सुटीत मैत्रिणीकडे गेली असताना साळवे याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. मुलीच्या मामांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी साळवे व मुलीस श्रीगोंद्यातून ताब्यात घेतले. गु

न्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांनी काम पाहिले.

सरकारी पक्षाच्या वतीने ७ साक्षीदार तपासण्यात आले. मुलगी, फिर्यादी मामा, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, दैठणेगुंजाळचे ग्रामसेवक व तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News