आजच्या सूर्यग्रहणाचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम ? जाणून घ्या..

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : या वर्षातील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण आज (रविवार) होणार आहे.  सकाळी १० वाजून १७ मिनिटांपासून ग्रहणाचा स्पर्शकाळ सुरू होईल. मध्य दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांनी असेल, तर मोक्षकाळ दुपारी १ वाजून ५१ मिनिटांनी होईल.

ज्योतिष आणि विज्ञानाच्या गणनेनुसार, यावेळी होणाऱ्या ग्रहणामध्ये सूर्याचे ९८ टक्के बिंब चंद्राकडून झाकले जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार, हे ग्रहण काही प्रमाणात शुभ फळ देणारे आहे.

मृगशीर्ष, आर्द्रा नक्षत्र आणि मिथुन राशीच्या लोकांना हे ग्रहण लागेल. ग्रहणादरम्यान, गुरु, शनी, मंगळ, शुक्र, राहू आणि केतू वक्री अवस्थेत असतील. हे ग्रहण अंशत: किंवा पूर्णत:ही नसेल.

जाणून घेऊयात ग्रहणाचा राशींवर काय परिणाम होणार याविषयी :
मेष – लाभ प्राप्ती
वृषभ – कार्यक्षेत्रात अडथळे
मिथुन – कष्टदायक
कर्क – कौटुंबिक चिंता
सिंह – लाभ प्राप्ती
कन्या – आनंदकारक
तुला – मानसिक चिंता
वृश्चिक – कष्टदायक
धनु – आरोग्यचिंता
मकर – सौख्यकारक
कुंभ – आरोग्यपीडा
मीन – शारीरिक कष्ट

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews