राहुरी ;- पहाटे नैसर्गिकविधीसाठी जात असलेल्या महिलेस एका इसमाने पाठीमागे येवून हात पकडून मी तुझ्या सोबत येवू असे म्हणत लजा उत्पन्न होईल
असे कृत्य केल्याने पोलिसात विनयभंग केल्याचा गुन्हा ३६ वर्षिय महिलेने दाखल करताच पोलिसांनी आरोपीस गजाआड केले आहे.
राहुरी तालुक्यातील केंदळ भागात ३६ वर्षिय विवाहित महिला ही दि. १९ जून रोजी पहाटच्या दरम्यान नैसर्गिक विधीसाठी जात असतांना
येथिल विनायक श्रीधर सावंत याने पाठिमागे येवून संबंधित महिलेचा हात धरला व मी तुझ्या सोबत येवू का असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
या बाबतचा जाब विचारण्यासाठी पिडीत महिलेचे पति गेले असता त्यांनाही विनायक सावंत याने शिविगाळ करत धमकी दिली आहे. राहरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
- देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार तब्बल बारा हजार लोकांनी घेतली, केला विक्रम
- गुलमोहर रस्त्यावर पारिजात चौकातील ड्रेनेज लाईन कामासाठी १० दिवस वाहतुकीच्या मार्गात बदल रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकात १५० झाडे लावणार
- माझी लाडकी बहीण योजना 2025: पैसे कधी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट
- सरकारच्या ह्या योजनेतून ….१५ महिन्यांत दुप्पट होतील तुमचे पैसे !
- महाराष्ट्र मेट्रोत नोकरीची जबरदस्त संधी, फक्त 100 रुपयांत अर्ज पगार 2.8 लाखांपर्यंत!