अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील रहिवासी असलेली बारावीच्या कला शाखेतून परीक्षा दिलेली ज्योती विजय काळे (वय १८) हिने राहत्या घरात शुक्रवारी साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
ही घटना घडली तेव्हा तरुणीचे वडील घराला बाजूस रंग देत होते, तर आई नदीवर धुणे धुण्यासाठी गेली होती. एक बहीण वडिलांना रंगकामात मदत करत होती.
शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
याप्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल ए. व्ही. गवसने हे करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews