अहमदनगर :- दिल्लीगेटच्या पार्किंगमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीवर रेप करण्यासाठी आरोपी शुभम सुडकेने मित्राची कार वापरल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
शहरातील अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिल्ली गेट परिसरात घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
प्रेमसंबंध निर्माण करून गेल्या अडीच वर्षांपासून १७ वर्षांच्या मुलीला मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलीने याबाबत फिर्याद दिली आहे.
त्यानुसार नगरमधील नालेगाव येथील शुभम ज्ञानदेव सुडके याच्याविरुद्ध पळवून नेणे, बलात्कार करणे, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अगोदर प्रेमसंबंध निर्माण करून नंतर त्याने संशय घेत तिला मारहाण सुरू केली. याच दरम्यान सुडके याने दिल्लीगेट पार्किंगमध्ये कारमध्येच तिच्यावर रेप केला.
पोलिसांत गुन्हा दाखल होताच त्याला बेड्या ठोकल्या. पण त्याने रेपसाठी वापरलेली कार स्वत:ची नसून मित्राची असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
एमआयडीसी परिसरात भाडोत्री खोलीत राहणार्या मित्राची कार त्याने रेपसाठी वापरली. आता तो मित्र नगर सोडून गेला आहे.
त्याने रेप केला ती कार पोलिसांनी जप्त केली. कारमालकाने ही कार स्वत:च पोलिसांकडे आणून दिल्याचे समजते.
कारची मालकी एकाकडे असून दुसराच तिचा वापर करत होता. हीच कार सुडके याने रेपसाठी वापरली. शुभम सुडके याने पिडित मुलीवर अत्याचार करण्यासोबतच तिला मारझोडही केली.
मारहाणीत दोनदा तिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्याचीही पोलीस खातरजमा करत आहेत.
दरम्यान शुभम हा एका नगरसेवकाचा समर्थक आहे.
शुभम सुडके हा सातत्याने त्रास देत असल्याने पीडित मुलगी व तिच्या आई यांनी ‘चाइल्डलाइन’ची मदत घेतली.
‘चाइल्डलाइन’च्या एका कर्मचाऱ्याच्या मदतीने पीडित मुलीने कोतवाली पोलिस स्टेशनला जाऊ न आरोपी सुडकेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
- पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ! पतीसह सासू, सासरा आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल…
- विमानाचं मायलेज नेमकं किती असत बरं ? वाचा ‘हि’ रंजक माहिती..
- ‘या’ देशात मिळते चक्क दुबईपेक्षाही स्वस्त सोने !
- स्मार्टफोन बाजारात भारताचा दबदबा ; विक्रमी निर्यातीचा अंदाज
- मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर ; उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची झाली दिल्लीला बदली