पावसाची शासकीय आकडेवारी ‘या’ तालुक्यासाठी ठरणार डोकेदुखी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : शासकीय कामकाजाचे आजवर अनेकांना चांगले व वाईट अनुभव आले आहेत. यात जास्त करून नुकसानच होण्याचा धोका असतो.शासनाच्या या कामाचा अनुभव राहुरी तालुक्यातील जनता अनुभवत आहे.

यात चक्क तालुक्‍यात होणाऱ्या पावसाच्या शासकीय आकडेवारीतच तब्बल २२ टक्के (१०० मिलीमिटर) वाढ करण्यात आली आहे. शासनाच्या या आदेशामुळे ४७९च्या ऐवजी आता ९५० मिलिमीटरची सरासरी गृहीत धरण्यात येणार असल्याने कृषी, दुष्काळ, आणेवारीतील निकषांवर याचा परिणाम दिसून येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ही मोठी डोखेदुखी ठरणार आहे. राहुरी तालुक्यात आठ मंडळे आहेत. १९६१ सालापासून या मंडळांमध्ये पावसाळ्यात झालेल्या पावसाची आकडेवारी एकत्रित करून जिल्हा विभाग, पुणे व मंत्रालयस्तरावर ती संकलित केली जाते.प्राप्त माहितीनुसार पुणे येथील हवामान विभागाकडून दर १० ते १५ वर्षात त्या त्या भागातील पावसाची सरासरी निश्चित केली जाते.

येथे ही अद्ययावत आकडेवारी तालकानिहाय व महिनानिहाय संकलित होते. तेथूनच ती शासनाधीन केली जाते.राहुरी तालुक्याची जून ते ऑक्टोबर दरम्यानची पावसाची सरासरी २००६ पर्यंत ४१९ मिलिमीटर इतकी निश्चित झालेली होती.

नंतर तालुक्याच्या ठिकाणी झालेला पाऊस ब तो आकडा गृहीत धरायला सुरुवात झाल्याने राहुरीची सरासरी १४ टक्क्यांनी वाढत ४८० मिलिमीटर इतकी झाली. १२ मे २०२०च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार पावसाची सरासरी नव्याने निश्चित करण्यात आली आहे.

हवामान विभागाने १९६१ ते २०१० या कालावधीतील पर्जन्यमान विचारात घेऊन तसेच २००६ मधील पावसाची आकडेवारी गृहीत धरून नव्याने पर्जन्यमानाची सरासरी निश्चित केली आहे.

विशेष म्हणजे दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठीदेखील सरासरी पर्जन्याचे आकडे यावे, असे आदेशात स्पष्ट आहे. सरासरी निश्चित करून १४ वर्षांचा कालावधी उलटून गेला होता,

त्यामुळे ही आकडेवारी पुन्हा निश्चित करण्याची आवश्यकता होती, असेही या निर्णयात म्हटले आहे. दुष्काळी स्थिती, खरीप व रब्बी हंगामाची आनेवारी,

ओला दुष्काळ या व अन्य बाबींसाठी त्या तालुक्यात शासकिय पावसाची सरासरी व प्रत्यक्षात झालेल्या पावसाची टक्केवारी यावर या सर्वांचे निकष अवलंबून असतात.

राहुरीत खरिपाची १७ गावे कोरडवाहू व कमी पावसाच्या भागात तर रब्बीची ६० गावे कमी-अधिक पावसाची आहेत. ६३० मिलिमीटर (२२ टक्के अधिक) ही शासकीय पावसाची सरासरी राहुरी तालुक्‍याला तारक ठरणार की मारक? असा प्रश्न उपस्थित होत आहे

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment