स्वप्न भंगल्यामुळे बोराटेंचे मानसिक संतुलन बिघडले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- तुम्ही पाहिलेले महापौरपदाचे मुंगेरीलालचे स्वप्न भंगल्यामुळे मानसिक संतुलन बिघडले आहे.

म्हणून तुम्ही महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर आरोप करत आहात, अशी टीका नगरसेवक रवींद्र बारस्कर, सतीश शिंदे यांनी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात बारस्कर, शिंदे यांनी म्हटले आहे की, नगरपालिका असताना जकात चोर नगरसेवक म्हणून प्रसिध्द होता. तुम्ही माया कशी मिळवली, अधिकाऱ्यांना ब्लॅक मेल करता हे सर्व नगरची जनता जाणते.

ज्या शिवसेनेचा एबी फॉर्म खिशात घेऊन तुम्ही राष्ट्रवादीचा एबी फॉर्म भरून शिवसेना राजकीय पक्ष व स्वत:च्या वॉर्डातील नागरिकांना फसवतात, पुन्हा एक वर्षानंतर पैशाचा बाजार मांडून महापौर निवडणुकीतून स्वत:ची तुंबडी भरून घेता.

वाकळे हे भाजपशी एकनिष्ठ राहिल्यामुळे गटनेता, सभागृह नेता, दोनवेळा स्थायी समितीचे सभापती व १४ भाजपचे नगरसेवक निवडणून आलेले असताना शहर विकासासाठी सर्व पक्षिय नगरसेवकांनी पाठिंबा देऊन महापौर केले. ही पदे मिळाली आहेत.

तुमची पाच टर्मची कारकीर्दचे आत्मपरीक्षण करा. तुम्‍ही काय मिळवले आणि काय गमवले. महापौर वाकळे यांनी संपूर्ण शहरासाठी १०० कोटींचा निधी आणला अाहे. त्याचा नगरवासीयांना सोयी सुविधेसाठी उपयोग होणारच आहे.

उर्वरित २०० कोटी रुपयेही लवकरच मिळणार आहेत. तुम्हाला मिळालेली मते ही तुम्हाला नाही, तर ज्या चिन्हांवर निवडणूक लढवली त्या पक्षामुळे व नेत्यांमुळे मिळाली आहे आणि अपक्ष लढवून आपली लायकी आजमावी, असेही बारस्कर, शिंदे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment