जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर :- अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला घारगाव पोलिसांनी अटक केली.

फारूक नानाभाई शेख (३२, रा. शेरी चिखलठाण, राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मार्च २०१९ मध्ये धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजेच्या वेळी हा प्रकार घडला होता.

आरोपीने साकूरजवळील मांडवे येथे जात मुलीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून

जांबुत बुद्रूक येथील मुळा नदीपात्रातील केटीवेअरजवळ तिच्यावर अत्याचार केला होता. शुक्रवारी (२१ जून) संबंधित पीडित मुलीने हा प्रकार पोलिसांना सांगितला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment