भरधाव जीप घुसली दुकानातपाच दुकानांचे नुकसान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :भरधाव वेगातील क्रुझरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या दुकानात घुसली. जीपने दुकानांना धडक दिल्याने यात ५ दुकानांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात गाडीचालक जखमी झाला.

हा अपघात रविवारी रात्री अडीच वाजता औरंगाबाद महामार्गावरील देवगड फाटा येथे घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुणे येथे प्रवासी सोडून नांदेडकडे भरधाव वेगात जाणारी क्रुझर जीप (एमएच २६ एएफ ०९७७) देवगड फाटा येथे डिव्हायडर तोडून ५ दुकानांना जोराने धडकली.

यात संभाजी झगरे,अंबादास नरोडे व सुरेश नरोडे, लक्ष्मण कोतकर, शकील शेख यांच्या दुकानाचे नुकसान झाले. याबाबत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश भोरे यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी गाडीचालकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. गाडीचालक सुनील चव्हाण यांच्या डोक्याला व हाताला मार लागला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment