अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अकोले तालुक्यातील कोतुळ येथे रविवारी कोरोना बाधीत पहिलाच रुग्ण आढळल्याने सतर्कतेचा उपाय म्हणून प्रशासनाने तब्बल 17 दिवस संपूर्ण कोतुळ गाव लॉकडाऊन केले आहे.
दरम्यान कोरोना बाधीत झालेला हा रुग्ण हा हॉटेल व्यावसायिक असल्याचे समजते. तसेच सुरुवातीला या व्यक्तीला काही त्रास होऊ लागल्याने त्याने तालुक्यातील मेहेंदुरी येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती समोर येत असून
मेहेंदुरी येथील डॉक्टर्स दाम्पत्यांसह इतर 11 जणांना क्वॉरंटाईन केल्याचे समजते. दरम्यान कोतुळ येथील हा रुग्ण असल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.
कोतुळ येथील ज्या भागात हा रुग्ण राहत आहे त्या ठिकाणचा भागही प्राधान्याने बंद करण्यात आला आहे. कोतुळ ही सुमारे 30 हुन अधिक गावांची मुख्य बाजारपेठ आहे.
त्यामुळे येथे आढळून आलेल्या कोरोनाचे लोण कोतुळ गाव व परिसरातील गावात पोहचू नये यासाठी तहसीलदार मुकेश कांबळे यांनी तातडीने आदेश काढून अत्यावश्यक सेवा वगळून
कोतुळ गाव हे दि.21 जून 2020 रात्री 12 वाजलेपासून दि.07 जुलै 2020 रात्री 12 वाजेपर्यंत असे सुमारे 17 दिवस संपूर्ण बंद ठेवण्याचे आदेश लेखी पत्राद्वारे संबंधित विभागाला दिले आहेत.
सदरील आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर व्यक्तींविरुद्ध साथरोग अधिनियम 1897 भारतीय दंड संहिता व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 56 अन्वये कारवाई करण्यात येईल असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews