अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : महिलेचा बेकायदा गर्भपात करणारा नगर तालुक्यातील जखणगाव येथील डॉ. शंकरप्रसाद दिगंबर गंधे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
आरोपी डॉ. शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे यांनी त्या महिलेचा गर्भपात करून अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले
जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री उशिरा महिलेचा बेकायदा गर्भपात केला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.
पथकाने लगेच घटनास्थळी धाव घेतली. तेथे एक महिला होती. चौकशी केली असता त्या महिलेचा गर्भपात केला असल्याचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना माहिती दिली.
डॉ. मुरंबीकर यांनी पथकासह हॉस्पिटलमध्ये येऊन पाहणी केली. त्यावेळी डॉ. गंधे याने महिलेचा बेकायदा गर्भपात केला असल्याचे उघड झाले.
कारवाई दरम्यान आरोपी डॉ. शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे यांनी त्या महिलेचा गर्भपात करून त्या अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व नगर तालुका पोलिसांनी डॉ. गंधे याला अटक केली. त्याच्याविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews