अहमदनगर ब्रेकिंग : 22 तोळे सोने आणि दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला !

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  जामखेड मधील पोकळे वस्तीवर तात्याराम पोकळे यांच्या घरावर बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. 22 तोळे सोने आणि दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि दरोडेखोरांनी पाठीमागचा दरवाजा कटावनीच्या सहाय्याने तोडला आणि ते आत घुसले.रात्री एक ते तीनच्या सुमारास ही चोरी झाली

घरातील सर्व लोक झोपेत असताना ही मोठी चोरी झाली. तात्याराम यांच्या आई पहाटे ऊठल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर ही चोरी लक्षात आली.

दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक सुरेश माने,अमरजित मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News