अजित पवारांचा इशारा; जुलै, ऑगस्ट हे दोन महिने धोकादायक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. मुंबईमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु आता चिंताजनक बाब समोर आली आहे. मुंबईमधील मृत्युदर वाढत असल्याचे चित्र आहे.

या कोरोनच्या पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जुलै आणि ऑगस्टमध्ये कोरोनाची परिस्थिती कठीण होऊ शकते, असा अंदाज आहे.

त्यामुळे लोकांनी बंधने नीट पाळली नाही, तर मोठी किंमत मोजावी लागू शकते असा इशारा त्यांनी दिला. कोरोना चाचण्या आम्ही वाढविल्या आहेत. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढली आहे.

आता लोकांना परवडेल, अशा नवीन चाचण्या आल्या असून, मास्कसोबतच सगळ्या गोष्टींचे दर आटोक्यात आणल्या जातील. जीवितहानी होऊ नये यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.

तसेच करोनाच्या काळात जुलै आणि ऑगस्ट महिना अधिक त्रासदायक ठरू शकतो. नागरिकांनी करोना काळात स्वतःची काळजी घेतली नाही, तर मोठी किंमत मोजावी लागेल’, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment