अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : विनापरवाना मुख्यालय सोडल्याबाबत जाब विचारणाऱ्या महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची थेट मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा वजा धमकी मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात यांनी दिली आहे.
आपण मागासवर्गीय अधिकारी असल्याने वारंवार, जाणीवपूर्वक मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचा गंभीर आरोपही लेखापरीक्षकांनी सादर केलेल्या खुलाश्यात केला आहे.
या प्रकारामुळे महापालिकेच्या अधिकारी वर्तुळातच चांगलीच खळबळ उडाली आहे. मुख्य लेखापरीक्षक खरात यांना आयुक्त मायकलवार यांनी २२ जूनरोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
२२ जून रोजी कार्यालयाच्या वेळेपूर्वी कार्यालयातून घरी जाणे, दररोज कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वी मुख्यालय सोडून घरी निघून जाणे,वरीष्ठांची परवानगी न घेणे, मनपा ही अत्यावश्यक सेवा पुरविणारी संस्था असतांनाही असभ्य गैरवर्तन करणे,
आदींबाबत आयुक्तांनी खरात यांना जाब विचारून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर खरात यांनी खुलासा सादर करतांना आयुक्तांनाच तक्रार करण्याचा इशारा देत त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews