अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्याचे ऐतिहासिक वैभव म्हणजे भुईकोट किल्ला होय. परंतु या किल्ल्याच्या बुरुजांची तसेच अंतर्गत भागाची पडझड झाली आहे. या संदर्भात रसिक ग्रुपच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनाची पर्यटन खात्याने दखल घेतली आहे.
परंतु जो पर्यंत प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही तोपर्यंत रसिक ग्रुप यासाठी पाठपुरावा करणार असून कोरोनाचे सावट हटल्यानंतर पर्यटन विकासासाठी रसिक ग्रुप किल्ला महोत्सव आयोजित करणार असल्याची माहिती रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी दिली.
येलूलकर म्हणाले की, आज पर्यंत रसिक ग्रुपच्या पुढाकारातून गेली तीस वर्षे शहराचा वर्धापनदिन विविध ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी संगीत मैफिल, गझल, काव्य, आयोजित करीत शहराच्या या वास्तूंना पर्यटनास चालना मिळण्यासाठी प्रयत्न करत आला आहे.
या सर्व कार्यक्रमांना नगरकरांनी मोठा प्रतिसाद देत शहराविषयी प्रेम व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे रसिक ग्रुपचा गुढीपाडवा सांस्कृतिक महोत्सवास नगरकर रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.
नगरकरांनी आजपर्यंत रसिकला भरघोस प्रतिसाद दिला आहे. भविष्यात कोरोना विषाणू संकट निवळल्यानंतर प्रशासनाच्या मार्गदर्शनाने हा सांस्कृतिक सोहळा साजरा होताना तसाच प्रतिसाद सर्व देतील आ विश्वासही येलूलकर यांनी व्यक्त केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews