अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : मतदारसंघात आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासकामे मार्गी लागली असुन 15 वर्षांपासुन पारनेरचा विकास हा टक्केवारीत अडकला असल्याची टीका आ.निलेश लंके यांनी केली आहे.
कोहकडीत विविध विकास कामाचे भूमिपूजन आ.लंके यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोहकडी परिसरातील आ.विजय औटी यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादीच्या गोटात सामिल झाले आहेत.
पारनेर-नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची संघटनात्मक वाटचाल पाहता तालुक्याच्या राजकीय पटलावर संपूर्ण मतदार संघात कलाटणी मिळालेली पहावयास मिळत आहे.
कोहकडी येथे विविध विकास कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी पार पडला. आमदार लंके यांच्या प्रयत्नातून कोहकडी गावास भरभरून निधी दिला गेला.
त्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे वर्ष 2019-20 या योजनेच्या अंतर्गत कोहकडी ग्रामपंचायत येथे रस्ता काँक्रिटीकरण योजनेचा भूमिपूजन समारंभ आ. निलेश लंके यांच्या हस्ते रविवारी पार पडला.
यावेळी अशोकराव सावंत, सचिन वराळ, सोमनाथ वरखडे, विक्रमसिंह कळमकर, सुवर्णाताई धाडगे, दादाभाऊ वाखारे, ठकाराम लंके, माजी सभापती सुदाम पवार,
सरपंच डॉ. साहेबराव पानगे, उपसरपंच सौ.वैशाली गोगडे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews