अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील ६ रुग्ण बरे होऊन परतले घरी तर नव्या १२ रुग्णांची भर
अहमदनगर जिल्ह्यातील ०६ कोरोनाग्रस्त रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे. जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे. तर, आज जिल्ह्यात आणखी बारा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
नगर शहरातील वाघ गल्ली येथील ४२ वर्षीय महिला, ४५ वर्षीय आणि ५० वर्षीय पुरुष तसेच १८ वर्षे युवक कोरोना बाधित. सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील.
सुपा (पारनेर) येथील ५६ वर्षीय महिला कोरोना बाधीत. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी झाल्या होत्या दाखल
चंदनपुर (राहाता) येथील २४ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल.
संगमनेर शहरातील मोमीनपुरा भागातील ४६ वर्षीय पुरुष आणि नाईकवाडपुरा भागातील ५० वर्षीय महिला कोरोना बाधित. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी केले होते दाखल.
श्रीरामपूर येथील ५२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल.*श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील ७६ वर्षीय महिला कोरोना बाधित.
ठाणे येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित. मूळचा पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील असून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे.
कळवा (मुंबई) येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित. मूळचा दरेवाडी (नगर) येथील असून मुंबई पोलिस दलात कार्यरत.
खडकवाडी येथील पोलिसासह ठाण्याहून हे दोघे एकत्र अहमदनगर येथे आले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews