रामदेव बाबांच्या कोरोना औषधावर ठाकरे सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. यामुळे अनेक देशांच्या आर्थिक घड्या विस्कटल्या आहेत. यावर लस शोधण्याचे काम संबंध जगभरात सुरु आहे.

परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजलीने यावर कोरोनील हे आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. पतंजलीकडून कोरोनिल औषध हे लवकरच बाजारात उपलब्ध केले जाणार आहे, अशी घोषणाही बाबा रामदेव यांनी केली.

परंतु यावरून वाद निर्माण झाल्याने आयुष मंत्रालयाने या दिव्य कोरोना किटच्या जाहिरातीवर बंदी आणली होती. तर राजस्थान सरकारने यापुढचे पाऊल उचलताना गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, महाराष्ट्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आला आहे. महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सरकारची भूमिका मांडली आहे.

मध्यरात्रीनंतर ट्विट करून महाराष्ट्र सरकारचा निर्णय जाहीर केला आहे.कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायलबाबत काही माहिती उपलब्ध नाहीय. जयपूरची एनआयएमएस संस्था याचा तपास करत आहे.

यामुळे अशा धोकादायक औषधाला महाराष्ट्र सरकार कधीही परवानगी देणार नाही. यामुळे महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात येत आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment