अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : पुढील तीन दिवसांत अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार तसेच पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यत येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी १ जून पासूनच दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत आहे. गेल्या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली, मात्र बुधवार (दि.२४) पासून पाऊस पुन्हा सुरु झाला आहे.
जिल्हयात गेल्या २५ दिवसात सुमारे २४९३.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या वर्षीच्या पावसाच्या हंगामातील सरासरी ३४.५६ टक्के पाऊस गेल्या २५ दिवसातच बरसला असल्याने पाऊस या वर्षी सरासरी गाठेल असा अंदाज व्यक्त होवू लागला आहे.
यावर्षी राहुरीत सर्वाधिक ६१.५१ टक्के, श्रीरामपूर मध्ये ५३.१९ टक्के पाऊस झालेला आहे. तर श्रीगोंदा (१९.३७), जामखेड (२०.९८), पाथर्डी (१९.४७) या तालुक्यांमध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews