आ. विजय औटी यांना मोठा राजकीय फटका बसणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  कोहकडीत विविध विकास कामाचे भूमिपूजन आ.लंके यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोहकडी परिसरातील आ.विजय औटी यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादीच्या गोटात सामिल झाले आहेत.

विजयराव औटी समर्थक राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या आठवड्यात सरपंच डॉ. पानगे यांनी माजी आमदार विजयराव औटी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्व पदाधिकारी व सहकार्‍यां समवेत उपस्थिती दर्शविली होती.

त्या सर्वांना बरोबर घेत कोहकडी गावाचा विकास करण्यासाठी आ. निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून यापुढे काम करणार आहे असे त्यांनी जाहीर केले आहे.

माजी सभापती सुदाम पवार यांच्या शिष्टाईला यश आले असून या घटनेमुळे माजी आ. औटी यांना मोठा राजकीय फटका बसणार असल्याचे जाणकरांचे मत आहे.

कोहकडी गावच्या विकास कामासाठी सर्व गट-तट विसरून संपुर्ण गाव एकत्र आले आहे. व यापुढेही गावच्या विकासासाठी मी सरपंच या नात्याने आमदार निलेश लंके व सभापती सुदाम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे कोहकडीचे सरपंच डॉ.साहेबराव पानगे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment