अहमदनगर :- नगर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नवख्या व युवा नेतृत्वाने प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला आहे.
पारगाव भातोडी, पारेवाडी, मजले चिचोंडी या गावांमध्ये विद्यमान सरपंचांच्या हातातून सत्ता निसटली आहे.
पारगाव ग्रामपंचायतीत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या गटाचा दारूण पराभव करत युवा व्याख्याते गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने दिमाखदार विजय मिळविला.
तालुक्यातील पारगाव, पारेवाडी, मजले चिंचोली, भोयरे पठार, भोयरे खुर्द, इसकळ व पारगाव मौल्ला या ग्रामपंचायतींसाठी रविवारी (२३ जून) मतदान झाले होते.
नगर तहसील कार्यालयाच्या आवारात सोमवारी (२४ जून) सकाळी मतमोजणी झाली. पारगाव भातोडी येथे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सरपंच शिवाजी शिंदे यांची सत्ता होती.
या वेळी त्यांच्या सुनबाई भारती नितीन शिंदे या सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांच्याविरोधात युवा व्याख्याते गणेश शिंदे यांच्या भावजयी मीनाक्षी संतोष शिंदे यांचे आव्हान होते.
गणेश शिंदे यांनी आमदार कर्डिले यांच्या उमेदवाराविरोधात आघाडी उघडल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते
यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ताकद दिली. गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सरपंचपदासह आठही जागांवर दिमाखदार विजय मिळविला.
- टाटांचा शेअर करणारा मालामाल ! प्रसिद्ध ब्रोकरेजने दिली महत्वाची अपडेट
- मारुतीची सर्वात स्वस्त 7-सीटर कार, आता खास डिस्काउंटसह उपलब्ध
- प्रतीक्षा संपणार ! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढणार, मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय, ‘या’ दिवशी होणार अंतिम निर्णय
- एसबीआय कडून 25 वर्षांसाठी 45 लाखांचे गृह कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार ? संपूर्ण कॅल्क्युलेशन पहा…
- Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती 2025: सूर्याचा उत्तरायण आणि त्याचा महत्त्व