अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज ७० व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील ०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ इतकी झाली आहे.
कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये संगमनेर येथील ०३, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
दिनांक : २४ जुन रोजी २४ रुग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.
दिनांक : २५ जुन रोजी २१ रुग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.
गेल्या २ दिवसात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४५ ने वाढली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना पॉझिटीव्ह नोंद झालेली रुग्ण संख्या ३५४ इतकी झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनातुन एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण संख्या २६० इतकी आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या आज ८२ झाली असुन हे रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
स्त्रोत : नोडल अधीकारी,डॉ. बापुसाहेब गाढे,
जिल्हा रुग्णालय, अहमदनगर
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews