नेवासे : पंचायत समितीच्या सोनई गणाची पोटनिवडणूक प्रत्यक्षात एकतर्फी झाली. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या कारभारी डफळ यांनी भाजपच्या प्रकाश शेटे यांचा ३२८९ मतांनी दारुण पराभव केला.
भाजपचा धुव्वा उडण्यास आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचे खापर फोडण्यात येत असून त्यामुळे त्यांच्या राजकीय अडचणींत वाढ होणार आहे.
नेवासे पंचायत समितीच्या सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सभापतिपदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली.
राजकारण न करता ही निवडणूक बिनविरोध करण्याची लोकभावना होती. तथापि, माजी आमदार शंकरराव गडाख यांची राजकीय कोंडी करण्याच्या हेतूने आमदार मुरकुटे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही निवडणूक लोकांवर लादल्याचा आरोप करण्यात येत होता.
मुरकुटे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवून अटीतटीच्या लढतीचे भ्रामक चित्र उभे केले होते. ऐन विधानसभेच्या तोंडावर झालेल्या या दारुण पराभवाने त्यांनी ‘हात दाखवून अवलक्षण’ करून घेतल्याची चर्चा तालुक्यात आहे.
पोटनिवडणुकीत क्रांतिकारीच्या कारभारी डफळ यांना ८२६४, तर भाजप उमेदवार प्रकाश शेटे यांना ४९७५ मते मिळाली. नोटाला २१३ मते मिळाली. डफळ यांनी शेटे यांचा ३२८९ मतांनी दारुण पराभव करून भाजप नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वल्गना किती पोकळ होत्या ते दाखवून दिले.
- गव्हाच्या ‘या’ 4 जातीच्या लागवडीतून मिळणार विक्रमी उत्पादन ! कमी खर्चात मिळणार 50 क्विंटल पर्यंत उत्पादन
- शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन 100% मालामाल बनवणार ! ‘या’ 5 मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव, पिवळ्या सोन्याचे लेटेस्ट रेट चेक करा….
- प्रतीक्षा संपली ! बॉक्स ऑफिस गाजवलेला दशावतार चित्रपट ‘या’ तारखेला OTT वर रिलीज होणार, कुठं पाहणार चित्रपट ?
- महार वतनाची जमीन म्हणजे कोणती जमीन ? भारतीय कायद्यानुसार अशा जमिनी विकता येतात का ? वाचा डिटेल्स
- Post Office ची ही योजना ठरणार गेमचेंजर ! दरवर्षी मिळणार दोन लाख 46 हजार रुपयांचे व्याज