संगमनेर :- नगरपालिकेच्या एका जागेसाठी रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. परंपरागत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात कांँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.
उमेदवाराला अपेक्षित मते मिळू न शकल्याने शिवसेनेची नाचक्की झाली. काँग्रेसच्या राजेंद्र कारभारी वाकचाैरे यांनी शिवसेनेच्या कविता तेजी यांचा पराभव केला.

संगमनेर नगरपरिषदेत काँग्रेसचे वर्चस्व आहे. याशिवाय नगराध्यक्षपदही काँग्रेसच्या ताब्यात असून पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसच्या जागेत एका जागेची वाढ झाल्याने विरोधकांचे आता पालिकेत केवळ दोनच नगरसेवक उरले असून या दोन्ही महिला आहेत.

शिवसेना एक आणि भाजप एक असे विरोधकांचे संख्याबळ राहिले आहे. आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरात झालेल्या विकासकामांमुळे आणि निळवंडे धरणातून थेट पाइपलाइनने शहराला नियमित पाणी पुरवठा केला जात असल्याने
विरोधकांच्या ताब्यातील या एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून देत संगमनेरकरांनी आमदार थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. वाकचौरे यांच्या विजयासाठी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी मोठी संपर्क मोहीम राबवली.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













