त्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील डॉक्टरसह नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कालचा दिवस श्रीरामपुरकरांसाठी काहिसा दिलासादायक ठरला. निपाणी वाडगाव येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील डॉक्टरसह नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

तसेच रेव्हेन्यू कॉलनी परिसरातील एकाला संशयावरून तपासणीसाठी पाठवण्यात आले.दोन महिलांच्या संपर्कातील २० व निपाणी वाडगाव येथील चौघे अशा २४ जणांचे अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत.

शहरातील कांदा मार्केटचा मागील भाग व गोंधवणी रस्त्याच्या परिसरात कोरोनाबाधित सापडल्याने खबरदारी म्हणून हे दोन्ही भाग सील करण्यात आले आहेत.

निपाणी वाडगाव व महांकाळ वाडगाव येथेही प्रत्येकी एक रुग्ण असल्याने खबरदारीच्या उपाययोजना या दोन्ही गावांत करण्यात आल्या. शहरासह तालुक्यात चार बाधितांवर उपचार सुरू आहे.

त्यांच्या संपर्कातील ३३ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. पैकी निपाणी वाडगाव येथील एका डॉक्टरसह नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला असला

तरी त्याने दिलेल्या पार्टीला उपस्थित असलेल्या चार मित्रांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. महांकाळ वाडगाव येथील महिलेला तिचा नातेवाईक पुणे येथून भेटण्यासाठी आल्याचे समजते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment