अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेलवाडी येथील रहिवाशी असलेल्या ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर (वय-३०) याचे व त्याची पत्नी सविता खोतकर (वय-२५) या दोघांचे अज्ञात कारणावरून रात्रीच्या दहा वाजेच्या सुमारास वाद निर्माण होऊन त्या रागातून त्याने थेट विहिरीकडे धाव घेऊन आपली जीवनयात्रा संपवली
त्यास वाचविण्यास गेलेली पत्नी कविता खोतकर हिनेही त्या पाठोपाठ विहिरीत उडी मारल्याने घरातील बहीण धावत त्यांना वाचविण्यासाठी गेली असता तिंचा तोल जाऊन तीही विहिरीत पडली
मात्र सावधानता बाळगत जवळच्या ग्रामस्थानी तातडीने दोर सोडल्याने तिला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले असले तरी विहिरीतील पाणी काढण्यास उशीर झाल्याने हे पतिपत्नी वाचविण्यात मात्र ग्रामस्थांना अपयश आल्याने त्यानां मात्र आपला जीव गमवावा लागला आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील रेलवाडी या ठिकाणी मयत ज्ञानेश्वर खोतकर हा आपल्या आई,वडील,एक परित्यक्त्या बहीण,एक दोन वर्षाची मुलगी असा परिवार राहत होता.
वडील शेळी पालन करून या कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होते तर मयत हा मजुरीचा करीत होता.मयताचे साधारण चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते.मयत ज्ञानेश्वर खोतकर याच्या पोटात काल सायंकाळी ७.३० च्या सुमारास दुखू लागल्याने त्याने आपल्या पत्नीसह कोपरगाव येथील खाजगी दवाखान्यात धाव घेतली होती.
ते उपचार करून घरी आल्यावर झोपले असताना अचानक मयत तरुण हा रात्री दहा वाजेच्या सूमारास बाहेर ओरडत आला व त्या पाठोपाठ त्याची पत्नी ओरडत येत असताना आपल्या सासूला तक्रार वजा सुरात,” आत्या बघा हे ऐकत नाही,बाहेर पळू राहिलेत”हा आवाज ऐकून वडील व आई हे जागे झाले त्यांना पुढे मुलगा पाठोपाठ त्याची पत्नी व त्यांच्या पाठोपाठ मयताची परित्यक्त्या बहीण पळताना दिसून आले.
पुढे मुलाने थेट विहिरीत उडी मारली व त्याला वाचविण्यास गेलेली त्याची पत्नीने त्या पाठोपाठ विहिरीत उडी मारली व या दोघाना वाचविण्याच्या प्रयत्नांत मयताच्या बहिणीचा तोल जाऊन तीही विहिरीत पडली.मात्र या आवाजाने आजूबाजूचे ग्रामस्थ जागे होऊन तेही मदतीसाठी पळत आले
त्यातील काहींनी ताबडतोब विहिरीत दोर सोडल्याने पडलेली मयताची बहीण वाचविण्यात त्यांना यश आले मात्र आधी विहिरीत उडी मारलेल्या पती-पत्नी यांना वाचविण्यास ते विहीर तळात गेल्याने विहिरीतील पाणी काढण्यास उशीर लागल्याने ते या दुर्घटनेत मयत झाले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews