आश्चर्य!येथे खुर्च्यांनाही मिळते पंख्याची हवा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : आज कोरोनामुळे सर्व सामान्य माणसाला अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा नैसर्गिक साधन संपत्तीची उधळपट्टी करत आहे. 

याचा कुकाणा येथील नागरिक घेत आहेत. येथील कामगार तलाठी कार्यालयात दिवस रात्र विजेचे दिवे सुरु ठेवून मोठ्या प्रमाणावर विजेचा अपव्यय होत आहे. विजेच्या बचतीचा मंत्र देणाऱ्या सरकारला मात्र वीज बचतीचा विसर पडला आहे.

नागरिकांमधून त्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. कुकाणा कार्यालयात शुक्रवारी सुरू केलेले दिवे, पंखे थेट रविवारी बंद केले जातात. हे तीन दिवस सर्रासपणे विजेचा अपव्यय होतो आहे.

शुकवारी सकाळी ११ वाजेपासून रविवारपर्यंत कार्यालयातील प्रत्येक कक्षाचे विजेचे दिवे चालूच राहतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीत येथील खुर्च्यांना पंख्याची हवा खायला मिळते.

रात्रभर कार्यालयात विजेचा लखलखाट करून विजेचे भरमसाठ बिल आल्यानंतर ते जनतेच्याच पैैशातून भरले जाते. त्यामुळे तातडीने प्रशासनाने कामगार तलाठ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment