अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :सध्या अनेक भागात बिबट्याने नागरी वस्तीत धुमाकूळ घालत अहेत. यात अनेकांना आपला जीव गमावला तर अनेक जखमी झाले आहेत.
नुकताच नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे. याबाबत सविस्तर असे की, या भागात ऊस मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक वेळा बिबट्याचे दर्शन या परिसरातील नागरिकांना होते.
त्यानुसार बालाजी देडगाव येथील गणेश अशोक औटी यांच्या शेतीमध्ये वनविभागाने भक्ष्य ठेऊन लावलेल्या पिंजऱ्यात आज सकाळी दीड वर्षे वयाचा बिबट्या पिंजऱ्यात आडकला.
नेवासा विभागाचे वनपाल दशरथ झिंजुर्डे, वनपाल मुस्ताक सय्यद,वन कर्मचारी चांगदेव ढेरे, एस.आर.मोरे, डी. टी. गाडे, उपसरपंच दत्ता मुंगसे यांनी घटना स्थळी भेट देऊन बिबट्या पिंजऱ्यासह तालुक्यातील लोहगाव येथील वनविभागाच्या नर्सरी मध्ये हलविला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews