शेवगाव :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोधेगाव उपबाजार आवारातील हॉटेलमध्ये सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास बेवारस सडलेल्या स्थितीतील मृतदेह आढळला.
उपबाजार समितीच्या आवारात दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारच्या दिवशी जनावरांचा मोठा बाजार भरतो. तेथील मच्छिंद्र पवार यांच्या पोते, ताडपत्री असलेल्या हॉटेलमध्ये हा मृतदेह होता.
मृतदेहाची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात सुटली होती. याबाबतची खबर पवार यांनी बोधेगाव पोलिस दूरक्षेत्रास दिली. कॉन्स्टेबल संपत एकशिंगे, हरी धायतडक यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरु केली.
मृतदेहाची ओळख पटली नसली, तरी तो परिसरात साडी विकणारा असावा, अशी चर्चा आहे. मृतदेहाची स्थिती पाहता त्याचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता जात आहे.
- लष्करी हद्दीतील समस्यांबाबत खा. लंके यांची बैठक नागरी समस्या तसेच बेलेश्वर, खोपेश्वर मंदिर विकासाचा प्रश्न मार्गी लागणार
- मुंबई ते गोवा प्रवास होणार वेगवान ! दोन्ही शहरांमधील प्रवास 6 तासांवर येणार, ‘हा’ महामार्ग लवकरच खुला होणार
- कौतुकास्पद ! UPSC परीक्षेत पुण्यातील अर्चितचा देशात तिसरा नंबर !
- मोठी बातमी ! चौंडी मंत्रिमंडळ बैठकीच्या निविदा जाहिरातीतील गोंधळावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा
- ओंकार खुंटाळेचे युपीएससी परीक्षेत यश!