राहुरी :- तालुक्यातील कानडगाव येथील विवाहित महिलेला पती, सासू व दोन जावांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही घटना 26 जून रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे घडली.
याप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेत शबाना मेहमूद शेख, राणी मुक्तार देशमुख, अमिन महम्मद देशमुख (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) हे जखमी झाले आहेत.
शबाना मेहबूब शेख यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, 26 जून रोजी सकाळी साडेसात वाजे दरम्यान आरोपी इंताज अजिज शेख, शाईन जावेद शेख, साजिदा अब्बास शेख, मेहबूब अब्बास शेख सर्व रा. कानडगाव
या चारजणांनी शहाना शेख यांना ‘तू आम्हाला नको आहे, तू नांदायला कशाला आली? तुझ्या व माहेरच्या लोकांमुळे आमची खूप चव गेली. तू माहेरी निघून जा.’ असे म्हणत तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी शबाना शेख यांना सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या भावजय राणी देशमुख यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. दरम्यान, आरोपी इंताज शेख हिने बाटलीमध्ये आणलेले पेट्रोल शबाना शेख यांच्या अंगावर ओतले.
तसेच त्यांचे भाऊ यांच्या मालकीच्या चारचाकी वाहनावर दगड मारून वाहनाचे नुकसान केले. 25 जून रोजी रात्री यातील चार आरोपींनी फिर्यादीला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेबाबत राहुरी पोलिसांत फिर्यादीच्या दोन जावा, सासू व पती अशा चार जणांवर भादंवि. कलम 326, 323, 427, 504, 506, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आहे.
- तिरुपती बालाजी मंदिरात दान करण्यात आलेल्या मोबाईलचा लिलाव होणार ! 4 आणि 5 ऑगस्टला ऑनलाईन लिलाव होणार
- भारतातील टॉप 10 भ्रष्ट सरकारी विभाग कोणते ? सर्वाधिक भ्रष्ट सरकारी खात्याचे नाव आहे शॉकिंग
- दररोज 37,000 रुपयांचे कमिशन ! पेट्रोल-डिझेल विक्रीतून व्हाल मालामाल, पेट्रोल पंपाचे लायसन्स कस मिळत, किती पैसे लागतात?
- वास्तु दोष, वाईट नजर आणि अपयश सगळं काही दूर होईल! ‘हा’ वास्तू उपाय एकदा करून बघाच
- Post Office ची MIS स्कीम गुंतवणूकदारांसाठी ठरणार वरदान ! 2,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?