कोपरगाव :- शहरातील दोघांनी स्वतंत्र घटनांमध्ये आपल्या राहत्या घरी बुधवारी गळफास घेत आत्महत्या केली.
गांधीनगर भागात इनडोअर गेम हॉलजवळ राहणाऱ्या नीलेश किसन दरंदले (वय ३७, महादेवनगर) यांनी राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेतला.
शहरातील औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या किरण विजय चव्हाण (वय १३) या शाळकरी मुलीने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले.
दोन्ही घटनांबाबत संतोष सीताराम तांबे व कोपरगाव ग्रामीण रूग्णालयाने दिलेल्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
या आत्महत्यांचे कारण समजू शकले नाही. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प
- फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग
- धरणातील गाळ काढण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण करा- विखे पाटील
- महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी सरकारची नवीन नियमावली जाहीर !