श्रीगोंदा : तालुक्यातील एकाच गावातून पळून गेलेले सैराट ज़ोडपे श्रीगोंदा पोलिसांनी मुंबई येथे ज़ाऊन ताब्यात घेतले असून, या दोघांना श्रीगोंदा पोलिस स्टेशनला आणले आहे.
एक दुसऱ्याविषयी असलेल्या आकर्षणातून अल्पवयातच अनेक मुले व मुली घरच्यांचा विचार न करता पळून जात आहेत.
याबाबत पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर या सैराट जोड्या पकडण्याचा ताण पोलीस यंत्रणेवर पडत आहे. तालुक्यातून पळून गेलेले असेच एक सैराट ज़ोडपे
श्रीगोंदा पोलीस ठाण्यायातील कर्मचाऱ्यांनी दोघांना मुंबईतील एका अतिसंवेदनशील परिसरातून ताब्यात घेतले असून, या दोघांनाही श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आणले.
याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील एक अल्पवयीन मुलगी चार पाच दिवसांपूर्वी त्याच गावातील दुसऱ्या समाजातील मुलासोबत पळून गेली.
मुलीच्या घरच्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मुलगा- मुलगी वेगळया समाजातील असल्यामुळे वातावरण गंभीर झालं.
पोलिसांनी या सैराट जोडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतू यातील मुलगा चलाख असल्यामुळे शोध घेण्यात अडचणी येत होत्या.
पोलिसांनी त्या मुलाच्या एका नातेवाईकाला विश्वासात घेऊन संबंधित मुला- मुलीचा ठावठिकाणा शोधून काढला. परंतू ज्याठिकाणी हे सैराट जोडपं लपून बसलं होतं
त्याठिकाणी जाण्यास तेथील स्थानिक पोलीससुद्धा धजावत नव्हते.परंतू श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे बडे व कोतकर यांनी न डगमगता त्या अतिसंवेदनशील परिसरात ज़ाऊन संबंधित मुलगा व मुलीला ताब्यात घेतले.
या वेळी तेथील त्या मुलाच्या समाज़ातील जमावाने पोलिसांना मोठा विरोध केला, यामुळे या जोडप्याला सोबत घेऊन पोलिस जवळच्या पोलीस स्टेशनला गेले.
तेथेही मुलाच्या नातेवाईकांनी जोडप्याला घेऊन जाण्यास विरोध केला.
पोलिसांनी त्यांना कायद्याचा धाक दाखवत या जोडप्याला श्रीगोंद्यात आणून सदर मुलाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
Don’t forget to like, share, and follow Ahmednagarlive24 On Social Media Stay tuned with us.
Get Breaking News Updates Of Ahmednagar
Visit Website – http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
Subscribe to on YouTube Channel – http://bit.ly/YT-Ahmednagarlive24
Like us on Facebook – http://bit.ly/FB-Ahmednagarlive24
Follow us on Twitter – http://bit.ly/TW–Ahmednagarlive24
Follow us on Instagram – http://bit.ly/IG-Ahmednagarlive24
Download Our App– http://bit.ly/Ahmednagarlive24App
- पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ! पतीसह सासू, सासरा आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल…
- विमानाचं मायलेज नेमकं किती असत बरं ? वाचा ‘हि’ रंजक माहिती..
- ‘या’ देशात मिळते चक्क दुबईपेक्षाही स्वस्त सोने !
- स्मार्टफोन बाजारात भारताचा दबदबा ; विक्रमी निर्यातीचा अंदाज
- मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर ; उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची झाली दिल्लीला बदली