अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : अभिनेता सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर काहींनी सुशांतची हत्या केल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
सुशांतच्या मोबाईलचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टनुसार आत्महत्येपूर्वी जवळपास १० वाजता सुशांतने गुगलवर स्वत:ला सर्च केलं होतं.
आत्महत्या केली त्यादिवशी म्हणजेच 14 जूनला सकाळी 10.15 मिनिटांच्या दरम्यान सुशांतने त्याचेच नाव Sushan singh Rajput सर्च केलं होतं.
स्वत: बाबतचे काही आर्टिकल्स वाचले होते. मोबाईलच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये त्याने “सुशांत सिंह राजपूत” हे नाव सर्च केल्याचं दिसत आहे. सुशांत आपलं करिअर आणि इमेजबाबत चिंतेत असल्याचं आणखी एक कारणही समोर येतं आहे.
दरम्यान सुशांतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. काहींच्या मते, ही आत्महत्या नसून सुशांतची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
आतापर्यंत सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 28 लोकांचे जबाब नोंदवून घेतले आहे. सुशांतचा व्हिसेरा रिपोर्टही समोर आला आहे.
या रिपोर्टनुसार सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा अमली किंवा विषारी पदार्थ मिळाला नाही. पोलिस चौकशी अद्याप सुरु असून इतर लोकांकडे तपासणी केली जात आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews