तरुणीचा खून करून मृतदेह फेकला

Published on -

नेवासा – तालुक्यात तरुणीचा खून करून मृतदेह रस्त्यावर टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि महालक्ष्मी हिवरे परिसरात राहणारी तरुणी ज्योती सर्जेराव उर्फ बाळासाहेब गायके (वय २७) हिला अज्ञात आरोपीने कशानेतरी मारहाण करुन जखमी केले,

तिला अज्ञात कारणावरुन मारहाण करुन कशाने तरी ज्योती गायके हिचा गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उरेशाने ज्योती या तरुणीचे प्रेत

शेवगाव – मिरी जाणाऱ्या रस्त्यावर मिरी शिवारातील हॉटेल दोस्तीच्या पश्चिम बाजूस रोडवर आणून टाकले व अपघाताचा देखावा करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न अपघाताचा केला.

या खळबळजनक प्रकरणी मयत ज्योती सर्जेराव उर्फ बाळासाहेब गायके यांचे भाऊ दीपक अण्णासाहेब तुपे, रा. शिराळ, ता. पाथर्डी

यांनी पाथर्डी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून करुन मृतदेह त्यावर टाकून अपघाताचा बनाव करणा-या आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe