राहुरी :- तालुक्यातील राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात महिन्याभरापूर्वी बियरबार हॉटेलातील प्राणघातक हल्ल्यात गंभिर जखमी झालेले मॅनेजर नरेद्र सदानंद शेटे यांचे उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने पोलिस ठाण्यात आरोपींवर भादवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा वाढीव गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान गुन्हेचे गांभिर्य ओळखुन पोलिस निरिक्षक हनुमंतराव गाढे यांनी तत्काळ ३०७, ३२६ चा गुन्हा दाखल केला होता. तर नुकतेच फीर्यादी शेटे हे उपचार दरम्यान मृत्यु झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
यातील तिघा आरोपींना पोलिसांनी मागेच अटक केली आहे. घटनेची पाश्र्वभूमी अशी की, दि. ३० मे २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान राहुरी रेल्वे स्टेशन येथिल हॉटेल अक्षय बियर बार येथे तुमच्या मालकाच्या मुलाने आमच्या माणसाला मारहाण केली होती असे म्हणत
वादाच्या कारणातून हॉटेल मॅनेजर नरेद्र शेटे वय वर्ष५५ यांना आरोपी दिपक भिमराज नवले, वय वर्ष ३३, लक्ष्मण आण्णासाहेब म्हसे, वय वर्ष ३३, अशोक वसंत म्हसे, तिघे रा. कोदवड, भीमराज श्रीधर बोरकर, वय वर्ष ३८, रा. केंदळ
या टोळक्यांनी हॉटेलात घुसून लाठ्या – काठ्या दांडक्याने बेदम मारहाण करत हॉटेलातील सामानाची मोडतोड केली होती. याबाबत राहुरी पोलिसात जखमी शेटे यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- तुम्हीही थेट गॅसवर पोळ्या भाजून खाताय?, या सवयीने वाढतो कॅन्सरचा धोका! आरोग्य तज्ज्ञांचा गंभीर इशारा
- श्रावणातील प्रत्येक शनिवारी करा ‘ही’ खास पूजा, शनिदेवाचा कोप शांत होऊन बरसेल कृपादृष्टी!
- शनिवारच्या शाळेची वेळ पूर्ववत खा. नीलेश लंके यांच्या पत्राची दखल
- महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राज्य सरकारवर टीका
- SBI, HDFC सह सर्वच बँकेच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! आरबीआयकडून ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर !