पारनेर :- तालुक्यातील कोहकडी येथे विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शुक्रवार संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
संध्या सुभाष गव्हाणे (२२) असे या तिचे नाव असून विवाहबाह्य संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.
गव्हाणे कुटुंबीय भटक्या समाजातील असून गेल्या काही वर्षांपासून ते कोहकडी येथे मोलमजुरीसाठी स्थायिक झाले आहेत.
मृत संध्याचे चार वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. त्यावरुन संध्या व पती सुभाष यांच्यात वाद होत.
संध्याकाळी संध्या घराजवळ रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेली दिसली. शेजाऱ्यांनी तिला उपचारांसाठी शिरूर येथे हलवले. मात्र, रस्त्यातच ती मरण पावली.
घटना घडली त्यावेळी अनैतिक संबंध असणारा तरूण संध्याच्या घराजवळून जाताना स्थानिकांनी पाहिला. पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आहे.
घटना घडली तेव्हा संध्या घरी एकटी होती. तिचा पती ऊसलागवडीसाठी, तर सासू-सासरे मजुरीसाठी बाहेर गेले होते.
- एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा आणि कोटीत परतावा मिळवा ‘
- सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता! तूर डाळीचे दर गडगडले; प्रतिकिलो ‘इतकी’ झाली स्वस्त
- 1 लाखपेक्षा जास्त किंमत असलेली टीव्हीएसची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 86 हजार रुपयांना खरेदी करण्याची संधी! या ठिकाणी मिळेल भन्नाट डील
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?
- 8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू