मुंबईहून आलेल्या नागरिकांकडून ग्रामसेवकाला धक्काबुक्की

 हमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : मुंबईतील घाटकोपरहून संगमनेर तालुक्यातील कुरण येथे आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवल्याचा राग मनात धरून ग्रामसेवकाला शुक्रवारी (३ जुलै) शिवीगाळ, धक्काबुक्की केली.

याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात दोन अल्पवयीन मुले तर दोन महिलांचाही समावेश आहे. आमच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करतो का, असे म्हणत घाटकोपरचे कुरणमध्ये मुक्कामास असलेल्या

९ जणांनी ग्रामसेवक गंगाधर राऊत यांना शुक्रवारी दुपारी सरकारी वाहन अडवून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. दरम्यान, राऊत यांनी शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून जाकीर समशेर शेख,

जहागीर शामीर शेख, जमशेद शामीर शेख, शाहीन जाकीर शेख, यास्मीन समशेर शेख, वसीम समशेर शेख, कय्युम महम्मद हुसेन शेख ( सर्व रा. घाटकोपर, मुंबई,

हल्ली रा.कुरण, ता.संगमनेर) आदींवर शहर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्यावरून गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंग परदेशी करत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment