शेवगाव तालुक्यात झालेल्या अपघातात एक ठार, ९ जखमी

Published on -

शेवगाव :- राज्यमार्गावर सौंदाळा-नागापूर शिवारात रविवार दि. ३० जून रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या दरम्यान ॲपे रिक्षा व इंडिका कार यांची समोरासमोर टक्कर झाली.

या अपघातात एक ठार, तर नऊ जण जबर जखमी झाले आहेत. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालय, श्वास हॉस्पिटल व नगर येथे हलविण्यात आले आहे.

प्रवासी वाहतूक करणारी ॲपे रिक्षा (क्र. एमएच १७ एजे १५४२) व इंडिका (क्र. एमएच ०४ बीवाय ४२६०) या दोन वाहनात भीषण अपघात होऊन नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील दिलीप साहेबराव मिसाळ (वय ५०) हे ठार झाले.

इंडिका गाडीने चुकीच्या दिशेने येऊन धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले असून इंडिका चालक फरार झाला आहे. ॲपे रिक्षा चालक गणेश दाते, रितेश कांक्रळे, सोपान मसुरे (औरंगाबाद), सविता बिरदवडे, मुलगी सायली बिरदवडे (रा. तरवडी, ता. नेवासा) येथील आहेत.

अपघातात ठार झालेले दिलीप मिसाळ यांचे चुलते शाहूराव मिसाळ, शामराव काळे (देवगाव), शिवा फुंदे (जालना), छबू काळे (शेवगाव), राजेश लाळगे (निघोज, पारनेर), विलास यादव (भेंडा) यांना उपचारासाठी श्वास हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News