अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : राजुरी येथील तीस वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण हा एका बड्या नेत्याचा वाहनचालक होता. त्या नेत्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर हा युवक राजुरी येथील घरी आला.
स्थानिक कमिटीने त्याला दोन दिवस क्वारंटाइन केले होते. रविवारी दुपारी दोन वाजता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तो ज्या भागात राहतो तो भाग प्रशासनाने सील केला.
त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना शिर्डी येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. स्थानिक वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,
राजुरीचे सरपंच, उपसरपंच , कामगार तलाठी, ग्रामसेवक, कमिटी, स्थानिक पातळीवर लक्ष ठेवून असून राजुरीत शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews