जग पाहण्याआधीच आईच्या पोटात बाळाला घ्यावा लागला अखेरचा निरोप …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. तिला श्रीरामपूरला न्यायचे ठरले. मोटारसायकलीवरून तिला घेऊन नातेवाईक निघाले. पुढे केसापूर येथे श्रीरामपूरला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केलेला.

त्यामुळे परत माघारी फिरून लोणी असा प्रवास करावा लागला. त्यामुळे विलंब होऊन मातेला बाळ गमवावे लागले. केसापूर येथे कोरोनाचे चार रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने हे गाव पूर्णपणे बंद केले.

वाड्या-वस्त्यांवरील रस्ते, प्रवरा चारी नंबर २ वरील नरसाळी रस्ता बॅरिकेट्स बंद करण्यात आले. शिवाय प्रवरा नदीकाठच्या लोकांना दळणवळणाच्या दृष्टीने एकमेव आणि महत्त्वाचा असलेला कोल्हार-श्रीरामपूर रस्ताही केसापूर येथे पत्रे आणि बॅरिकेट्स टाकून बंद करण्यात आला.

त्याठिकाणी पोलिसांचा खडा पहारा आहे. केसापूर येथे आल्यावर रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर गर्भवती महिलेला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात नेण्याचे ठरले. गळनिंब बंधाऱ्यावरून जात लोणी येथील रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले.

तथापि, मोटारसायकलीवर झालेली आदळआपट व झालेल्या विलंबामुळे जग पाहण्याआधीच आईच्या पोटात बाळाला अखेरचा निरोप घ्यावा लागला. आईचा जीव वाचला असला, तरी अर्भकाला वाचवण्यात अपयश आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment