अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी कट्ट्या विकणारा मुद्देमालासह एलसीबीने ताब्यात घेतला. या कारवाईत ३० हजार किमतीचा कट्टा व ५ हजारांचा मोबाइल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
गोविंद रामनाथ पुणे (३२, म्हस्की रोड, गलांडेवस्ती, वैजापूर, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना टाकळीभान बसस्थानकाजवळ एकजण गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत समजली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला कट्ट्यासह ताब्यात घेतले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews