अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :कोरोनाचे संक्रमण महाराष्ट्रात लक्षणीय आहे. अहमदनगरमध्ये मागील आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील प्रशासन आता आणखी सतर्कतेने काम करत आहे. कोरोना चाचणी प्रयोग शाळांमध्ये जलद गतीने चाचणी व प्रयोग शाळांचा पूर्ण क्षमतेने वापर केल्यास बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करता येतील.
आता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महत्वाचा आदेश जारी केले आहेत. करोनाच्या तपासणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता लागणार नाही.
तसेच लक्षणे नसणार्या रुग्णांना घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी घेतल्यानंतर रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता असणार नाही.
मात्र, त्यांनी घरातच विलगीकरण करण्यात येणार आहे.या संदर्भात काही सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत आदेशित केले आहे. त्यानुसार –
१) आयसीएमआर मान्यताप्राप्त खाजगी प्रयोगशाळेत करोना तपासणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असणार नाही. संबंधित प्रयोगशाळांना स्वॅब घेतलेल्या
व्यक्तींची माहिती तसेच कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती व जिल्हा शल्यचिकित्सक नगर व जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, नगर यांना दररोज कळविणे बंधनकारक असणार आहे. २) संबंधित माहिती आरटीपीसीआर अॅपवर टाकणे बंधनकारक असणार आहे .
३) खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना कोव्हिड-19 लक्षणे असणार्या व्यक्तींची तपासणी करावयाची असल्यास स्वॅब घेतल्यानंतर रुग्णालयात भरती करणे आवश्यक राहील.
कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची माहिती तातडीने निकटचे शासकीय रुग्णालयांना कळविणे तसेच त्यांना शासकीय आयसोलेशन इन्स्टिट्यूटमध्ये भरती होणे बंधनकारक असणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews