मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार करून शोषण

Published on -

राहुरी :- मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार करून शोषण केल्याप्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आरोपी मुजफ्फर लतीफ शेख व त्याची चुलती गुलशन रशीद शेख यांना पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली.

दोन वर्षांपूर्वी मुजफ्फर लतीफ शेख याने राहत्या घरातून युवतीचे अपहरण करत गुलशन रशीद शेख हिच्या घरात तिले डांबून ठेवले होते.

माझ्या पुतण्याबरोबर लग्न कर. नाही तर तुझ्यासह तुझ्या वडिलांना जीवे मारून टाकू, अशी धमकी गुलशन तिला देत असे. तू मुस्लिम झाली नाहीस, तर रॉकेल टाकून पेटवून देऊ,

आई- वडिलांना गावठी कट्ट्याने मारून टाकू, अशी धमकी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा गुन्हा महिलेच्या फिर्यादीवरुन राहुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मुजफ्फर लतीफ शेख हा वाळूतस्कर असून त्याची बारागाव नांदूर परिसरात प्रचंड दहशत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News